प्रतिनिधी / बेळगाव

अलतगा येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रा 2022 साली भरविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मंगळवार व शुक्रवार असे पाच वार पाळून शुक्रवार दि. 5 रोजी विविध कार्यक्रमाने या वारांची सांगता करण्यात आली. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंगेश्वर देवालयात पूजा, अर्चा करण्यात आली. त्यानंतर गावातील मोठीबाई, माळी भरमा, चव्हाटा, गणपती मंदिर, राम मंदिर, लक्ष्मी मंदिर, होळी कामाण्णा, बाळाबाई, मरगाई, गऊळ मंदिर, गुंडी देव, मसणाई, विठलाई, महादेव मंदिरात विधिवत पूजा, अर्चा करण्यात आली.
दरम्यान मिरवणूक झाल्यानंतर ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी 2022 रोजी श्री महालक्ष्मी यात्रा भरविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आर. के. पाटील म्हणाले, मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वांनाच नाहक त्रास झाला. त्यामुळे यात्रा भरविली नाही. आता इतर सोयीसुविधा योग्य प्रकारे व्हाव्यात या दृष्टिकोनातून ही यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे यांनी यात्रेपूर्वी आणि यात्रा काळात गावातील सर्व सोयीसुविधा पुरविण्याबाबत ग्राम पंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील तसेच रस्ते, गटारी व इतर सरकारी कामांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
16 फेबुवारीला लक्ष्मीमूर्ती आणणार
16 फेबुवारी रोजी शिरसंगी येथून श्री लक्ष्मी मूर्ती आणण्यात येणार आहे. त्यानंतर गावात कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. 17 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार असून याच दिवशी नवचंडीका होम होणार आहे. दुपारी 2 नंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री 8 ते 10 यावेळेत धारवाडकर महाराज (कोल्हापूर) यांचे कीर्तन होणार आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी सर्व मंदिरे बंद करण्यात येणार आहेत. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, उपाध्यक्ष संजय पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, विनोद शिंदे, गिरीजा सुतार, नारायण पावशे, पितांबर पाटील, सोमनाथ आलोजी, उमेश चौगुले, मनोहर आलोजी, बाळू चौगुले, बाबू जाधव, देवाप्पा आलोजी, कल्लाप्पा पावशे, बाळू पाटील, पुंडलिक पाटील, परशराम चिखलकर, तातोबा पवार, कोमल काब्ंाळे, पुंडलिक कांबळे, मोहन आलोजी, अनिल पावशे, प्रमोद घुग्रेटकर, कल्लाप्पा आलोजी, कल्लाप्पा पवार, नारायण चौगुले, आर. के. पाटील, मनोहर भातकांडे, मल्लाप्पा घुग्रेटकर, आप्पा पावशे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









