ग्राम पंचायतचा पुढाकार – तालुका पंचायतमधूनही सहकार्य
प्रतिनिधी/ बेळगाव
किणये ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया नावगे गावाला उद्योग खात्री योजनेतून कामच मिळत नव्हते. यापूर्वीपासून येथील नागरिकांनी काम देण्याची मागणी केली होती. मात्र, या ठिकाणी 2007 साली उद्योग खात्रीतून कामे सुरू करण्यात आली होती. काही कारणास्तव ती बंद ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र, ग्राम पंचायतच्यावतीने पुढाकार घेऊन या कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना परिस्थितीत उद्योग खात्रीतील कामांना काही प्रमाणात स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली असून तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत किणये ग्राम पंचायतीच्यावतीने अनेक कामगारांना कामे देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नावगे येथेही कामांना सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.
तालुका पंचायतीच्यावतीने पुढाकार घेऊन प्रत्येक गावातील नागरिकांना काम देणे व उद्योग खात्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे. मागील काही वर्षे उद्योग खात्रीमध्ये जिह्याने उद्दिष्टापेक्षाही अधिक काम केले होते. मात्र, आता मागील दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आता तालुक्मयातचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2007 सालापासून कामाच्या प्रतीक्षेत असणाऱया नावगे ग्रामस्थांना आता उद्योग खात्री योजनेतून काम मिळाले आहे. या कामासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पीडीओ यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. याचबरोबर इतर कामगारांनाही कामे देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.









