लस घेतलेले लोक मास्कशिवाय बंद खोली, सभागृहात एकत्र येऊ शकतात असे अमेरिकेतील सीडीसीने स्पष्ट केले आहे. लस घेतलेल्यांसाठी 6 फूटांच्या अंतराचा नियमही शिथिल करण्यात आला आहे. तरीही अनेक बार, नाइट क्लबनी लसीकरणाचा पुरावा देण्यासाठी व्हॅक्सिनेशन कार्ड अनिवार्य केले आहे. क्लबच्या बॉलरुमध्ये नृत्य करणाऱया समुहांसाठी पांढऱया पट्टीने वेगवेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते. देशात विशेषकरून न्यूयॉर्क शहर आणि आसपासच्या भागांमध्ये पाटर्य़ांमध्ये केवळ लस घेतलेल्या लोकांनाच सामील होण्याची अनुमती आहे.
सीडीसीच्या व्हॅक्सिन कार्डसह कुठल्या तरी लसीच्या परीक्षणात सामील झाल्याचा पुरावा लोक देऊ शकतात. विदेशी लसींचे कार्डही मान्य होणार आहेत. न्यूयॉर्क प्रांतात बार, क्लब्सना लसीकरणाचे पुरावे मागण्यास सांगण्यात आले आहे. अन्य प्रांतांमधील स्थिती काहीशी वेगळी आहे. कॅलिफोर्नियात लसीकरण कार्ड किंवा कोविड निगेटिव्ह अहवालाची अनुमती आहे.
दुसरीकडे फ्लोरिडात लसीकरणाचा पुरावा मागणाऱया व्यापारी संस्था, शाळा आणि शासकीय कार्यालयांवर 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा कायदा तयार करण्यात आला आहे. खासगी पाटर्य़ांमध्ये बाउंसर ग्राहकांचे व्हॅक्सिन कार्ड पाहतात. काही आयोजक अतिथीच्या लसीकरणाच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची सेवा घेत आहेत. अशा पाटर्य़ा कंपन्या आणि धनाढय़ांकडून आयोजित होत असतात.









