प्रतिनिधी /वास्को :
लॉकडाऊनच्या तयारीसाठी काल गुरूवारी वास्कोत ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभरात सोशल डिस्टनसिंगचे पूर्णपणे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. अशा प्रकारामुळे लॉकडाऊनपूर्वीच कोरोना प्रसाराला प्रत्यक्षरीत्या खतपाणी घातल्यासारखे झाले आहे. रात्री साडे आठ वाजेपर्यंत वास्कोत ग्राहकांची गर्दी होती.
जून महिन्याच्या पहिल्या तारखेला मांगोरहिलमध्ये कोरोना बाधीत आढळून येताच वास्को लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसली होती. तेव्हाही कालच्या प्रमाणेच वास्कोत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उाडली होती. तेव्हाही लोकांना कोरोना प्रसाराला हातभार लावला होता. पुन्हा तीच परिस्थिती गुरूवारी वास्कोत पाहायला मिळाली.
गुरूवारी वास्कोत पावसाने कहरच केला. काही वेळा जोरदार पाऊस पडला. बाजारात काही ठिकाणी पाणीही भरले. परंतु लोकांनी भर पावसातच खरेदी केली. प्रत्येक दुकानांसमोर ग्राहकांचा घोळका आणि काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. चिकन, मटण, मास विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहक तुटून पडत असल्याचे दृष्य होते. भाजी आणि मासळी मार्केटमध्ये ऐरव्हीपेक्षा जास्तच गर्दी उसळली. शारीरीक अंतराचे भान कोणालाच नव्हते.
मार्केटमध्ये भाजी टंचाई, दर भडकले, व्यापाऱयांकडून लुट
वास्कोतील भाजी मार्केटमध्ये दुपार होण्यापूर्वीच भाजी टंचाई सुरू झाली. टोमॅटो मार्केटमधून गायबच झाले. हळुहळु इतर भाज्याही गायब होऊ लागल्या. ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात भाज्या खरेदी केल्याने ही परिस्थिती उद्दभवल्याचे बोलले जाते. मात्र, मोठय़ा संख्येने लोकांना दुपारनंतर भाज्या मिळाल्या नाहीत. झटपट खरेदीचा लाभ मार्केटमधील व्यापाऱयानीही उठवला. तीस रूपये किलो टोमॅटो एwशी रूपयांपर्यंत पोहोचला होता. इतर भाज्यांचे दरही भडकले होते. संधी शोधणाऱया व्यापाऱयांनी मागच्या लॉकडाऊनप्रमाणेच पुन्हा चांदी करून घेतली. संध्याकाळी वास्कोत दुधही गायब झाले होते.









