नवी दिल्ली
1 एप्रिल ते 25 मे या कालावधीत रेल्वे मालवाहतुकीत 10 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. सदरच्या कालावधीत देशभरात 203.88 दशलक्ष टन इतक्या मालाची वाहतूक करण्यात आली आहे. तर 2019 मध्ये समान कालावधीत रेल्वेने 184.88 दशलक्ष टन इतक्या मालाची वाहतूक केली होती. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे मंडळाचे चेअरमन व इतर अधिकाऱयांसोबत त्यांनी एक बैठक घेतली होती. मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असून रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधांसाठी (गुडसशेड, टर्मिनल) प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले.









