बेंगळूर
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली बेंगळूरची कंपनी इन्फोसिसच्या सहसंस्थापक एस. डी. शिबुलाल यांनी पुन्हा भारतीय भांडवली बाजारात 100 कोटींचे समभाग खरेदी केले असल्याचे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार शिबुलाल यांनी 7.22 लाख समभाग 1 हजार 384 प्रति समभाग सरासरी दराप्रमाणे खरेदी केले आहेत. सदरचे समभाग खुल्या बाजारातून घेतले आहेत. सदरच्या कंपनीत शिबुलाल आणि पत्नी कुमारी हे प्रवर्तक आहेत. याआधी शिबुलाल यांनी 12 मे रोजी 100 कोटींचे समभाग खरेदी केले होते.









