बेंगळूर
ऑनलाइन ग्रॉसरी क्षेत्रात नावाजलेल्या बिग बास्केटला 31 मार्च 2020 अखेरच्या वर्षात महसुलात 36 टक्के वाढ झाली असल्याचे समजते. बिग बास्केटमधील मोठा हिस्सा हा टाटा ग्रुप घेणार असून त्यासंदर्भातली कार्यवाही सध्या सुरू आहे. या कालावधीत तोटाही 26 टक्के वाढून 710 कोटी रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वीच्या वर्षात तो 562 कोटी रुपये होता. दरम्यान बिग बास्केटच्या खर्चातही वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. बिग बास्केटचा खर्च 4 हजार 411 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 2019 आर्थिक वर्षात हा खर्च 3 हजार 365 कोटी इतका होता.









