बेंगळूर
तंत्रज्ञान उद्योगात दीर्घकाळाचा अनुभव असणाऱया विक्रम सिंग बेदी यांची गुगल क्लाऊड इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) निवड करण्यात आली आहे. या आधी या पदावर करण बाजवा हे कार्यरत होते. त्यांना आता गुगल आशिया पॅसिफीक विभागाचे मुख्य म्हणून कार्य पार पाडावे लागणार आहे. येणाऱया काळात गुगल क्लाऊड विक्री व कार्यप्रणाली संघाच्या कार्यात बेदी हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना जवळपास 26 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. ऑनलाइन ग्रॉसरी कंपनी ग्रोफर्सच्या अध्यक्षपदी त्यांनी सेवा बजावली आहे. ऍमेझॉन क्लाऊड युनिटची भारतात बेदी यांनी स्थापना केली होती. आयबीएम व ओरॅकलमध्येही त्यांनी सेवा बजावली आहे.









