काबूल / वृत्तसंस्था
तालिबानचा सर्वोच्च नेता समजला जाणाऱया हबिबुल्ला अखुंदजादाने दक्षिण अफगाणिस्तानातील कंधार या शहरात आपण असल्याचे स्पष्ट केले आहे. रविवारी त्यांनी या शहरात लोकांसमोर येऊन आपण जिवंत असल्याचे दाखवून दिले. गेले कित्येक आठवडे त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तिला त्यांनी पूर्णविराम दिला. तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून ते कोणाला दिसले नव्हते.
शनिवारी त्यांनी कंधार येथील जामिया दारुल उलूम हकीमिया या धार्मिक संस्थेला भेट दिली. अखुंदजादा यांच्याकडे तालिबाचे सर्व राजकीय, धार्मिक आणि लष्करी अधिकार असल्याचे सांगितले जाते. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अस्थायी सरकार आहे. त्याला कोणत्याही देशाने अजूनपर्यंत अधिकृत मान्यता दिलेली नाही. तसेच आर्थिक साहाय्यही पेलेले नाही.









