बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हा आणि चिकोडी शैक्षणिक जिह्यामध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. यामुळे पुन्हा भितीचे वातावरण पसरले. मात्र जिल्हाधिकाऱयांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट केले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या शिक्षकांना कोरोना झाला होता. त्यामुळे भितीचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव शैक्षणिक जिह्यामध्ये एकूण 18 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये बेळगाव ग्रामीण 10, शहर 4, रामदुर्ग तालुक्मयामध्ये 3 आणि कित्तूर तालुक्मयात एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. चिकोडी शैक्षणिक जिह्यामध्ये एकूण 4 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे.









