प्रतिनिधी / वाळवा
वाळवा परिसरामध्ये सध्या इस्टेटीची नोंदणीचा सर्वे हा बोगस प्रकार चालु असुन, तुमच्या घराची नोंदणी झाली आहे का ? नसेल तर आमच्याकडे नाव नोंदणी करा आणि इस्टेटीची ऑनलाइन नोंदणी करा. प्रत्येक कुटुंबाकडून ३० रुपये प्रमाणे लाखो रुपये उकळण्याचा उद्योग वाळवा परिसरात सुरू आहे. या गोलमालाला ग्रामसेवक व ग्रामपंचायतींचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. या गोलमालमध्ये काम करणाऱ्या तरुणी घरोघरी जाऊन तुमच्या घराची ऑनलाईन नोंदणी झाली आहे का ? यावर्षी नाव नोंद करून घ्या, नाहीतर पुन्हा कधी होणार नाही ! नोंदणी करताना फक्त ३० रुपये खर्च येणार आहे, असे सांगून घराचा बोगस सर्वे व नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे घरावर लावले जाणारे स्टीकर यावर कोणत्याही प्रकारचा शासकीय आदेश क्रमांक, शिक्का नाही, घरमालकाची यादी ग्रामपंचायतमधुन घेऊन स्टीकरवर नाव, पेनाने लिहिलेला नंबर घरा-घरावर लावली जात आहेत. हा सर्वे वाळवा गावांमध्ये पूर्ण झाला, गोटखिंडी येथे अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबामागे ३० रुपये प्रमाणे या महिला, मुली निधी आकारणी करतात.
लोक अशिक्षित लोक आणि ज्यांना या बोगस सेर्व्हेची माहिती नाही असे लोक या महिलांना आणि मुलींना फसवत आहेत. त्यामुळे हा काय प्रकार आहे ते लोकांना माहित नाही, ग्रामपंचायतीकडून ही संस्था घरांची यादी घेते आणि घराघरामध्ये सर्वे करते आहे ? शासकीय आदेशाची जुनी एक झेरॉक्सप्रत ग्रामपंचायतीला देऊन हा प्रकार चालू केला आहे. यामध्ये ग्रामसेवकांचे सुद्धा हात ओले झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासकीय आदेशानुसार प्रत्येक घरमालकाने आपल्या इस्टेटीची नोंदणी सरकारकडे करणे गरजेचे आहेच, आणि याची नोंदणी झाल्यानंतर संबंधित नगरपालिका किंवा ग्रामपंचायत त्या घरावर ॲल्युमिनियमची नेम्प्लेट आणि घराचा नंबर देतात, शासन दरबारी त्यांची नोंद होते, परंतु ही इस्लामपूर येथे कार्यरत असलेली एक खाजगी संस्था हा बोगस सर्वे करत असून, ॲल्युमिनियमची नेमप्लेट देत नाही, सध्या छापील केलेल्या कागदावर मालकाचे नाव आणि बोगस नंबर देऊन ही नोंदणी होते आहे. या संस्थेकडे कोणत्याही प्रकारची शासकीय ऑर्डर नाही तरीही हा पैसे उकळण्याचा गोरखधंदा तेजीत चालु आहे, हे लोकांना विषेश वाटत आहे.
या प्रकारामुळे दिवसाला हजारो रुपये आणि महिन्याकाठी लाखो रुपये उकळले जात असून, पंचायत समिती, तहसीलदार प्रांताधिकारी कार्यालय यांना याची यत्किंचितही कल्पना नाही, हा बोगस सर्वे करून संबंधित कंपनी मात्र लाखो रुपये उकळत आहे. आणि हा बोगस सर्वे होताना दिसत असताना लोकही अनभिज्ञ आहेत. या प्रकारावर चाफ लावणे गरजेचे आहे, अन्यथा सामान्य नागरिकांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर लुटले जाऊ शकते.








