प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील सांगलीवेस येथे मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे . सांगलीवेस भागात दोघा नागरिकांच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेले. याबाबत बिलाल अबुबक्कर शेख यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
बिलाल शेख यांचे सांगलीवेस येथे फॅब्रिकेशन व्यवसाय आहे. त्यांनी रेडमी कंपनीचा मोबाईल दुकानमध्ये चार्जिंग लावला होता. या मोबाईलच्या कव्हरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स होते. चोरट्यांनी सदर मोबाईल चोरून नेला.
तसेच या परिसरातच राहण्यास असलेल्या अन्य एका नागरिकाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईलही चोरट्याने चोरून नेला. याबाबत मिरज शहर पोलिसात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. या परिसरात मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांची टोळी कार्यरत आहे. सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.








