आणखी एक पराभव पडेल महागात, ‘प्ले-ऑफ’साठी पात्र ठरण्याच्या संधींना बसेल खीळ
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सनरायजर्स हैदराबाद गुऊवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला करणार असून यावेळी वरच्या फळीकडून यजमान संघाला अधिक सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत आणि आणखी एक पराभव त्यांच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीस पात्र ठरण्याच्या संधींना गंभीर खीळ घालेल.
अभिषेक शर्माला परत सलामीला आणणे सनरायजर्ससाठी मागील सामन्यात काम करून गेलेले आहे आणि आता त्यांना त्यांचा दुसरा सलामीवीर मयंक अग्रवाल याच्याकडून अधिक चांगली कामगिरी घडण्याची आशा असेल. एकूणच सनरायजर्सची फलंदाजी चमकू शकलेली नाही आणि म्हणूनच स्पर्धेच्या उत्तरार्धात त्यांच्यावर निराशाजनक परिस्थितीत सापडण्याचा प्रसंग येणे हे फारसे आश्चर्यकारक नाही.
अग्रवालने आघाडीला येऊन 110 ‘स्ट्राईक रेट’निशी फटकेबाजी केलेली असून तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीची कामगिरीही चांगली झालेली नाही. एडन मार्करमने कर्णधाराला साजेशा पद्धतीने फलंदाजी करण्याची गरज असून हॅरी ब्रूकने शतक ठोकूनही बहुतांश सामन्यांत तो अपयशी ठरलेला आहे. तो आता मधल्या फळीत परतला आहे आणि त्याला लय सापडेल अशी आशा व्यवस्थापन बाळगून आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे ‘आयपीएल’मधून बाहेर पडणे हा सनरायजर्ससाठी मोठा धक्का ठरला आहे. गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा ‘इकोनॉमी रेट’ सर्वांत वाईट आहे आणि त्याने सात सामन्यांमध्ये केवळ पाच बळी घेतले आहेत, ज्यामुळ संघासमोरील संकटात भर पडली आहे.
‘केकेआर’लाही त्यांच्या फलंदाजांकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण ते नऊ सामन्यांत सहा पराभव पत्करावे लागल्यानंतर आपली मोहीम पुन्हा ऊळावर आणू पाहत आहेत. ते खेळाच्या तिन्ही विभागांत कमी पडलेले असून ‘गुजरात जायंट्स’कडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार नितीश राणा याने हीच गोष्ट नमूद केली होती. महत्त्वाच्या सामन्यामध्ये आणि आघाडीच्या प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये सर्व मूलभूत गोष्टी चांगल्या प्रकारे करणे आवश्यक असते, असे तो म्हणाला होता.
पण राणानेही अपेक्षित सातत्य दाखवलेले नाही, तर एन. जगदीशनला अव्वल स्थानावर संघर्ष करावा लागलेला आहे. जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज या दोघांनीही अव्वल स्थानी चांगला फॉर्म दाखवलेला असला, तरी व्यवस्थापन त्यांच्यापैकी एकालाच खेळवू शकते. वेगवान गोलंदाज महाग ठरणे केकेआरला त्रासदायक ठरत आलेले आहे. अष्टपैलू आंद्रे रसेल आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येक षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. हर्षित राणाने आपल्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली असून त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि सुयश शर्मा हे फिरकी त्रिकूट प्रभावी ठरले असले, तरी त्यांना वेगवान गोलंदाजांची समर्थ साथ हवी.
संघ : कोलकाता नाइट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन , वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, मनदीप सिंग आणि जेसन रॉय.
सनरायजर्स हैदराबाद : एडन मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, फजलहक फाऊखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन, आदिल रशीद, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीश कुमार रे•ाr, अकील होसेन व अनमोलप्रीत सिंग.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून.









