वृत्तसंस्था/ दुबई
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दोन नव्या प्रँचायझीसाठी प्रत्येकी 7000 कोटी ते 10,000 कोटी बोलीची रक्कम राहील, असे अंदाज रविवारी वर्तवले गेले आहेत. सोमवारी बीसीसीआयकडून नव्या इच्छुक प्रँचायझींची अधिकृत घोषणा केली जाईल. देशातील 22 उद्योग समुहानी या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडे 10 लाख रूपयांच्या हमी रक्कमेवर टेंडर दाखल केले आहेत या टेंडरमध्ये नव्या संघांसाठी किमान 2000 कोटीची मुळ रक्कमेची अट घालण्यात आली होती.
आगामी आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱया नव्या अहमदाबाद संघासाठी देशातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी अदाणी उद्योग समुहातर्फे मोठी बोली लावणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे उद्योगपती संजीव गोयंका आणि गौतम अदाणी यांच्यातच मोठी चुरस अपेक्षित आहे. गोयंका हे रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे प्रमुख प्रँचायजी आहेत. बोली प्रक्रियेमध्ये भारताच्या एका माजी क्रिकेटपटूंचाही समावेश अपेक्षित असल्याची चर्चा सुरू आहे.









