दुबई / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी टी-20 वर्ल्डकप साखळी सामन्यात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजीत सूर सापडल्याने ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा दिलासा ठरला. मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामी लढतीत 4 षटकात 24 धावात 1 गडी बाद करत नियंत्रित टप्प्यावर मारा केला. टी-20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने 4 षटकांचा कोटा पूर्ण करण्याची ही 2018 नंतरची पहिलीच वेळ ठरली. टी-20 क्रिकेट प्रकारातील अव्वलमानांकित ऍस्टॉन ऍगरला संघात स्थान न मिळणे यावेळी धक्कादायक ठरले होते.









