लोणंद :
आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत आदर्की बु. ते आदकी खु. रोडवर आपली बदनामी केल्याचा संशय घेऊन, त्याचा राग मनात धरून दुचाकीला चारचाकी गाडीने धडक देवून खाली पाडले. तसेच कोयत्याने वार करून रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द) यांचा खून केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर (रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) याची माहिती देणाऱ्यास लोणंद पोलिसांच्यावतीने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
लोणंद पोलिसांनी विविध पथके तयार केली असून तांत्रिक माहितीच्या आधारेही त्याचा शोध घेण्यात येत आहे. दत्तात्रय निंबाळकर याचे वय 42 असून उंची 6 फूट आहे. रंग सावळा, बांधा मजबूत, वजन 90 किलो आहे. केस फौजी कट तर आर्मीतून पळून आला आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास लोणंद पोलिसांशी संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येऊन त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी केले आहे..








