बेंगळूर/प्रतिनिधी
‘उडान’ योजनेंतर्गत, स्टार एअर २१ डिसेंबरपासून कर्नाटकमधील बेळगाव ते गुजरातमधील सूरतसाठी थेट उड्डाण सेवा सुरु करणार आहे.
एअरलाइन्सच्या माहितीनुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे अशी बेळगाव ते सुरत सेवा असेल. दरम्यान आठवड्यातून तीनदा हे विमान उड्डाण करेल. दुपारी १२ वाजता बेळगाव येथून सुटून दुपारी १.२० वाजता सुरतला पोहोचेल.
परतीच्या दिशेने, विमान सूरतहून सायंकाळी ५.३० वाजता सुटते आणि बेळगावच्या सांब्रा विमानतळावर उतरते, असे विमान कंपनीने सांगितले आहे.









