नवी दिल्ली
गेल्या जानेवारी महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई मोटर इंडियाच्या कार विक्रीत 11 टक्के घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने 53 हजार 427 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात ही विक्री 60 हजार 105 इतकी होती. देशांतर्गत कार विक्रीतही जवळपास 15 टक्क्यांची घट दिसली आहे. दुसरीकडे निर्यात वाढून 9 हजार 405 वर पोहचली आहे.









