नवी दिल्ली
कोरोनाच्या काळात पूर्णपणे ठप्प राहिलेल्या हॉटेल उद्योगाचा आता कुठे हळुहळू का होईना व्यवसाय पूर्वपदावर येताना दिसतो आहे. पण एकंदर 2020 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतच्या महसुलात सुमारे 53 टक्क्यांची घट झाली असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीचे सर्व्हेक्षण नुकतेच स्थावर मालमत्ता सल्लागार कंपनी जेएलएल इंडिया यांनी केले होते. 2019 च्या तिसऱया तिमाहीच्या तुलनेत 2020 च्या तिसऱया तिमाहीत 19 टक्के इतकी महसुलात घट झाली आहे. भारताच्या महत्त्वाच्या 11 शहरांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात घट नोंदवली आहे. म्हणावी तशी या क्षेत्राला गती घेता येत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होताना दिसतो आहे. वरील शहरांपैकी बेंगळूरने सर्वाधिक 80 टक्क्यांची महसुलात घट नोंदवली असल्याचे सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.









