नवी दिल्ली : कोरोना महामारी संकटामुळे देशातील सर्व क्रीडा हालचाली ठप्प झाल्या असून अनेक स्पर्धा लांबणीवर तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. संपूर्ण भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येते याला दिल्लीही अपवाद नाही. दरम्यान भारताच्या काही हॉकीपटूंनी हॉकी प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याची विनंती केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांच्याकडे केली आहे.
प्रशिक्षण सराव कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आल्याने भारतीय हॉकीपटूंना सरावाची उणीव भासत आहे. हॉकीपटूंचे विविध लहान गट करून त्यांना हॉकी सराव सुरू करण्यास परवानगी द्यावी असे भारताच्या पुरूष आणि महिला हॉकी संघातील हॉकीपटूंनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना विनंती केली आहे. पुढीलवर्षी होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेसाठी इतर देशांच्या हॉकी संघाचा सराव सुरू झाला असल्याचे भारतीय हॉकीपटूंनी
सांगितले.









