वृत्तसंस्था/ हैदराबाद
सध्या सुरू असलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक आणि फलंदाज हेन्रिच क्लासेनला आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल 10 टक्के दंड स्पर्धा आयोजकांनी ठोठावला आहे.
शनिवारी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्लासेनकडून मैदानावर शिस्तपालन नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या सामन्यानंतर पंचांनी दिलेल्या सामना अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली होती. क्लासेनने स्वत: या गुन्ह्याची कबुली दिली. आता त्याला मिळणाऱ्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे या सामन्यात लखनौचा अमित मिश्रा याच्याकडूनही शिस्तपालन नियमाचा भंग झाला पण त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले.









