ऑनलाईन टीम / तरुण भारत
बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बीड मधील माफिया कारभारावरुन टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एक ट्विट केले असून बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली आहे, हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
नुकतच बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे ते किती दुर्दैवी आहे. असे ही त्या म्हणाल्या. यापुढे त्यांनी बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवाय, या मुद्य्याची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. तसेच या संदर्भात केलेलं ट्विट त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले असून बीडचे निमित्त साधत मुंडे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे मागील काही दिवसांमधील घटनांवरून दिसून येत आहे. अनेक राजकीय मंडळी देखील विविध गुन्ह्यांमध्ये आढळत आहेत. या निमित्ताने त्यांनी हा निशाणा साधला आहे.