प्रतिनिधी / अक्कलकोट
तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल. तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे. हे सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन शेती व घरांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे , पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, नगराध्यक्ष शोभा खेडगी, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, तालुका प्रमुख संजय देशमुख, तहसीलदार अंजली मरोड, अमोलराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आदीसह विविध खात्याच्या अधिकाऱ्याचीं प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देऊन शेती व घरांची पडझडीचे पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेले घरांची पडझड व शेती नुकसान याची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सांगवी खुर्द येथे 150 घरांची पडझड झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घराची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्तांना प्राथमिक प्राथमिक स्वरूपात मदत म्हणून 11 लोकांना दहा लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले.
तसेच सांगवी पूलाची पाहणी केली.अक्कलकोट तालुक्यातील रामपूर, बोरी उमरगे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल. अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय. कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
या प्रसंगी अशपाक बळोरगी, महेश हिंडोळे, राष्ट्रवादीचे दिलीप शिध्दे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानूरे ,सूर्यकांत कडबगावकर, माजी तालुकाप्रमुख सोपान निकते, गणेश वानकर ,युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार, सैपन पटेल, आकाश गडकरी, खंडू कलाल सभापती सुनंदा गायकवाड, काशी विभुते, धनंजय डिकोळे आदीसह विविध खात्याचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.