प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात सोमवारी भुलतज्ञ म्हणून डॉ. हेमलता देसाई यांची नियुक्ती झाली, त्या कागदोपत्री हजर झाल्या आहेत. येथील भुलतज्ञ डॉ. आरती घोरपडे या रजेवर आहेत. शिवसेनेच्या आंदोलनानंतर हृदय शस्त्रक्रिया विभागाला भुलतज्ञ मिळाला आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून हृदय शस्त्रक्रिया विभाग उभारला गेला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही झाले. येथील ह़ृदय शस्त्रक्रिया विभागासाठी स्वतंत्र भुलतज्ञाची मागणी आहे. पण शस्त्रक्रियेपुरताच तो दिला जातो. सध्या येथे डॉ. आरती घोरपडे यांची भुततज्ञ म्हणून नियुक्ती होती. पण त्यांच्याकडे वारंवार येणारा प्रभारी अधिष्ठाता कार्यभारामुळे पुर्णवेळ भुलतज्ञाची गरज भासत होती. त्यातून शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. यासंदर्भात शिवसेनेच्या आंदोलनानंतर डॉ. दीपक शिंदे या भुलतज्ञाची नियुक्ती झाली. पण त्यांनीही तांत्रिक कारणामुळे नकार दिला. दरम्यान, अधिष्ठात्यांनी नव्या भुलतज्ञांच्या नियुक्तीला उशीर लावल्याने पुन्हा आंदोलन झाले. त्यानंतर डॉ. हेमलता देसाई यांची भुलतज्ञ म्हणून नियुक्ती झाली. सोमवारी त्या या विभागात हजर झाल्या आहेत. पण आठवडÎातून त्या किती दिवस विभागात हजर राहणार, यासंदर्भातील चर्चा गुलदस्त्यात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









