बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच श्री सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्टेशन-हुबळी असे करण्यात येणार आहे.
१८३६ मध्ये बिदर येथे जन्मलेल्या श्री सिद्धरुधा स्वामीजींनी १९२९ रोजी हुबळीमध्ये मोक्षप्राप्ती केली असे मानले जाते. अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रतिपादक, ते आपल्या साध्या राहणीमान आणि त्यांच्या विचारांसाठी परिचित होते.
रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याविषयी गृहमंत्रालयाने कर्नाटक महसूल विभागाचे प्रधान सचिवांना सांगितले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सूचनेला मंत्रालयाला हरकत नाही.
कर्नाटक सरकार लवकरच देवनागरी (हिंदी), रोमन (इंग्रजी) आणि प्रादेशिक भाषांमध्ये नवीन नाव लिहून राजपत्र अधिसूचना जारी करेल, ज्यानंतर हे नाव बदलले जाईल, असे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (एसडब्ल्यूआर) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.









