प्रतिनिधी / हुपरी
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग धुमाकूळ घालत असून या महाभयंकर महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हीच गरज लक्षात घेऊन हुपरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांचे सहकारी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करुन महारक्तदान शिबीराचे आयोजन केले. या शिबिरात तब्बल १० दिवसांत १५०० रक्ताच्या बॉटल संग्रही करुन महाराष्ट्रात आदर्शवादी कार्य केले आहे. या उपक्रमाचा राज्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थानी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन आमदार राजू बाबा आवळे यांनी केले.
हुपरी ता. हातकणंगले येथील पोलीस ठाण्याच्या वतीने यशवंत मंगल कार्यालय यशवंतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सोनाली अभिनव देशमुख हया होत्या. यावेळी नगरपरिषेदेच्या नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा निता माने, इचलकरंजी विभागाचे डी. वाय. एस. पी. गणेश बिराजदार, दिलशाद मुजावर, आरोग्य निरीक्षक जे. के. कांबळे,नानासाहेब गाट यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









