आवानओलच्या कविसंमेलनात ‘वर्दळी’च्या घुसमटीचे चिंतन
प्रतिनिधी / कणकवली:
‘वाहनांखाली चिरडलेल्या माणसांचे शव निपचित पडून असतात रस्त्यावर/ सोपस्कार पूर्ण होण्याची वाट बघत/ ही आठवणही ओलांडू देत नाही मला रस्ता’ कवी मोहन कुंभार यांच्या या काव्यपंक्ती सादर झाल्या आणि आजच्या वर्दळीच्या जगण्याच्या घुसमटीचे चिंतन उपस्थित रसिकांना अंतर्मुख करून गेले. निमित्त होते ते ज्ये÷ कवी नारायण लाळे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे सादर झालेल्या आवानओल प्रति÷ानच्या खुल्या कविसंमेलनाचे.
आवानओल प्र्रति÷ानच्या दहाव्या कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्योत्सवातील खुले कविसंमेलन गोवा-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विविध भागातून आलेल्या कवींच्या कविता सादरीकरणातून रंगतदार झाले. यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष लाळे यांच्याबरोबरच प्रा. शोभा नाईक, प्र्रति÷ानचे अध्यक्ष अजय कांडर, राजेश कदम, विनायक साबळे, अच्युत देसाई, कल्पना मलये, मोहन कुंभार, किशोर कदम, सत्यवान साटम आदी संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
राजेश कदम यांनी अर्थवाही, भववाही सूत्रसंचालन केलेल्या या संमेलनात कवयित्रींचा सहभाग मोठय़ा प्र्रमाणात होता. यावेळी ऍड. मेघना सावंत यांनी ‘अमानूष परंपरा मोडणाऱया तिला पापणी समजणाऱयांशी संवाद साधतेय ती’ अशी स्त्राrच्या आजच्या मानसिकतेची आणि धाडसी समंजपणाची मानसिकता नेमकेपणाने आपल्या कवितेतून मांडली. तर दीपक प्रभू यांनी ‘काय दाटले आज अचानक नयनातून पाणी आनंदाने नाहू घालते लहरीमधून कोणी’ अशा हलक्मया फुलक्मया ओळी सादर करून गंभीर झालेले वातावरण हलके केले. मात्र त्यानंतर कवयित्री नीलम यादव यांनी ‘वीतभर पोटाच्या भुकेपेक्षाही मोठी वाटते इथल्या रस्त्यांची लांबी रुंदी आणि जीवंत माणसांच्या दु:खापेक्षाही मोठी करताय ते निर्जीव पुतळय़ांची उंची’ अशा काव्यपंक्ती सादर करून आजच्या राजकीय व्यवस्थेवर ओरखडेच ओढले. हाच सार्वजनिक वेदनेचा धागा मग कल्पना मलये यांच्याही कवितेतून धीरगंभीरपणे उमटत गेला. डॉ. पराग मुंडले यांनी आपल्या कवितेतून ‘मिट्ट काळोखी रात्र खुशाल सर्वत्र पसरू दे, फाकणाऱया दिशा दाही वहिवाट तिची मोडू दे’ अशी परंपरा मोडण्याची प्रेखsमळ साद घातली. कविसंमेलनात डॉ. अनिल धाकू कांबळी, नामदेव गवळी, अनिल साबळे, उज्ज्वला धानजी, उदय सरपे, सिद्धेश खटावकर, बबन हिवाळेकर, मधुकर मातोंडकर, दीपक तळवडेकर, सुजाता टिकले, सुचिता गायकवाड, सुरेश कुराडे, मनिषा पाटील, राजेंद्र गोसावी, आकांक्षा कांडर आदींनीही दमदार कविता सादर केल्या.
लाळे म्हणाले, चांगल्या कवितेचा शोध घेण्यासाठी कवींनी थोडा संयम बाळगणे गरजेचे असते. एखादी कविता लिहून झाली की लिहिलेल्या कवितेचेही चिंतन होत राहिलं पाहिजे. कविता लिहिल्या लिहिल्या ती प्र्रसिद्धीला पाठविणे चुकीचे. वाचन महत्त्वाचं असतं, परंतु कवितेची चर्चा आपल्या समकालीन मित्रांबरोबर सतत करीत राहिली पाहिजे. आवानओलचा हा उपक्रम नव्या कवींना प्र्रेरणा देणारा असून मोठय़ा प्र्रमाणात सहभागी झालेल्या या कवींच्या सहभागातूनही त्याची प्रचिती येत आहे.
हा प्रतिसाद असाच राहू दे
कणकवलीसारख्या भागात गेली दहा वर्षे आवानओलचा काव्योत्सवाचा उपक्रम सुरू आहे. त्याला दरवर्षी काव्य रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो. रसिकांच्या प्रेमातूनच साहित्यिक कार्यक्रम यशस्वी होतात. हा प्रतिसाद असाच पुढील कार्यक्रमानाही मिळत राहू दे, असे प्रतिपादन यावेळी लाळे यांनी केले.









