आचरा/ प्रतिनिधी-
आचरा बंदर ते हिर्लेवाडी आशा मुख्य रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. दुरवस्था झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे, शासन दरबारी मागूनही कार्यवाही होत नसल्याने शेवटी आचरा येथील हिर्लेवाडी गणेश मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी एकत्र येत या रस्त्यावरी खड़े स्वखर्चाने व श्रमदानातून बुजवले. गणेश चतुर्थी जवळ आली असताना खड्डे न बुजवणाऱ्या शासन प्रशासनाच्या डोळ्यात मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थांनी या कृतीतून अंजन घातले आहे.
याकामात मंडळाचे अध्यक्ष लवू मालडकर, किशोर हिर्लेकर, सुशील आचरेकर, विकास हडकर, आशिष कांबळी, प्रवीण पेडणेकर, हेमंत वराडकर, शशिकांत (बाबुराव) पेडणेकर, संतोष पेडणेकर, संजय तांडेल, प्रणय पेडणेकर, प्रशांत खोत, नंदकुमार तांडेल, सदाशिव(अण्णा) हिरलेकर, प्रकाश पाटकर, विजय हीरलेकर, विशाल पाटकर, शुभम गोलतकर, श्याम पाटील, सुहास मुणगेकर, पुरुषोत्तम पेडणेकर, अमर कांबळी, सिद्धेश वराडकर यांच्या सोबत वाडीतील वयोवृद्ध ग्रामस्थांसह सुमारे पन्नास ते साठ ग्रामस्थ सहभागी झाले होते. शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले पण ग्रामस्थांच्या एकीने आचरा बंदर ते हिर्लेवाडी रस्त्याला सुस्थितीत आणले व समाजापुढे आदर्श निर्माण केला