साहित्य : 1 वाटी सोललेले हिरवे वाटाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी पुदिना पाने, 2 ते 3 लसूण पाकळय़ा चिरून, अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चवीनुसार काळं मीठ, अर्धा चमचा साखर, 1 चमचा लिंबूरस
कृती : प्रथम हिरवे वाटाणे निवडून वाफवून घ्यावेत. नंतर निथळावेत. आता मिक्सर जारमध्ये घालून त्यातच कोथिंबीर, पुदिना पाने, लसूण पाकळय़ा, आलं, हिरवी मिरची आणि थोडंस पाणी घालून पातळ पेस्ट बनवून घ्यावी. नंतर त्यात मीठ आणि साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्यावे. आता तयार चटणी बाऊलमध्ये काढून त्यात लिंबूरस मिक्स करावे. आता तयार चटणी जेवताना तोंडी लावण्यास अथवा रोटी, चपातीसोबत खाण्यास द्या.
टीप : चटणी बनविण्यासाठी ताजे हिरवे वाटाणे वापरावेत. साखर आपल्या चवीनुसार वापरावी.









