ऑनलाईन टीम / मंडी :
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
सिमला मौसम विभगाचे निर्देशक मनमोहन सिंह यांनी सांगितले की, आज पहाटे 2 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र मंडी पासून 13 किमी दूर दक्षिण दक्षिण पश्चिममध्ये 5 किमी खाली होते. याची तीव्रता 3.2 रिश्टल स्केल एवढी होती.









