- 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार शिक्षण संस्था
ऑनलाईन टीम / शिमला :
शिमला, कुल्लू, मंडी आणि कांगडा या चार जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हा नाईट कर्फ्यू उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे. यासोबतच प्रदेशातील सर्व शिक्षण संस्था 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच 15 डिसेंबरपर्यंत जनमंच आणि राजकिय मोर्चांवर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच शाळांमध्ये 26 नोव्हेंबरपासून शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करतील. 10 वी, 12 वीच्या परीक्षा मार्च 2021 मध्ये सर्व शाळांमध्ये होतील. 30% अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. कोविड महामारी मध्ये क्लास 3 आणि 4 चे कर्मचारी 50% च येतील. तसेच बाहेर पडताना मास्क घातला नाही तर 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.