ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आता तर कोरोनाने मुख्यमंत्री कार्यालयात शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव पदावरील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व लोकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची आज पत्रकार परिषद होणार होती. मात्र, कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने ते आपल्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच ओक ओवरकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची देखील कोरोना टेस्ट केली जाणार आहे. सध्या त्यांनी स्वता:ला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे.
दरम्यान, काल देखील भाजपचे प्रवक्ते, पदाधिकारी आणि अन्य एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. प्रदेशात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









