ऑनलाईन टीम / शिमला :
शिमला संसदेतील खासदार सुरेश कश्यप यांची हिमाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानतंर सुरेश कश्यप यांनी आज (बुधवारी) भाजपचे मुख्यालय असलेल्या दिपकमल येथे येऊन गोपनीयतेची शपथ घेतली आणि आपला पदभार स्वीकारला.
यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, संगठन महामंत्री पवन राणा, माजी प्रदेश अध्यक्ष राजीव बिंदल यासह अन्य नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सुरेश कश्यप यांना शुभेच्छा दिल्या.









