बेंगळूर/प्रतिनिध
“ धर्म टिकवण्यासाठी हिंदूंचे राज्यसत्तेवर पूर्णपणे नियंत्रण असणे आवश्यक आहे” असे ट्विट भाजपचे बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्य बुधवारी केलं आहे. त्यामुळे खा. सूर्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यांनतर त्यांनी हे ट्विट केले आहे.
“प्रिय हिंदूंनो, सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे धर्म टिकवण्यासाठी हिंदूंचे राज्यसत्तेवर पूर्णपणे नियंत्रण असणे आवश्यक आहे. जेव्हा आम्ही राज्यावर नियंत्रण ठेवले नाही, तेव्हा आम्ही आपले मंदिर गमावले. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आम्ही पुन्हा बांधकाम केले. २०१४ @मधील २८२ आणि २०१९ मधील ३०३ श्री श्री @ नरेंद्र मोदी यांना आज शक्य झाले! ” अशी पोस्ट तेजस्वी सूर्य यांनी केली आहे. खा. सूर्या यांच्या या पोस्टने नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.