दररोज हजारो लिटर पाणी वाया : पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
आनंदवाडी-हिंदवाडी कॉर्नर येथे पाण्याला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी गळती असूनही पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. सतत वाहणाऱया पाण्यामुळे रस्ताही खराब झाला असून चिखलामुळे ये-जा करणे गैरसोयीचे होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या अनेक भागात पाण्याची गळती असूनही ती काढली जात नसल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जाते. आनंदवाडी-हिंदवाडी कॉर्नर येथे जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनचालक ये-जा करीत असतात. त्यांना पाण्याने भरलेल्या डबक्मयातूनच वाहतूक करावी लागते. तसेच चिखलाचेही साम्राज याठिकाणी पसरले आहे. त्यामुळे या जलवाहिनीची गळती काढावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.









