वार्ताहर/ हिंडलगा
बेळगाव तालुका ग्रामीण प्रथम भाषा मराठी आणि तृतीय भाषा हिंदी अशी पहिलीच ऑफलाईन कार्यशाळा हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाली. अध्यक्षस्थांनी हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एम. तरळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात हायस्कुलच्या विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने झाली. कार्यशाळेचे उद्घाटन नोडल अधिकारी यडमाने यांनी केले. सरस्वती प्रतिमेचे पूजन जे. के. पत्तार यांनी केले. तर दीपप्रज्वलन कार्यशाळा प्रमुख एस. व्ही. जाधव, ए. आर. पाटील, कळसद, अडसाटी, रुपाली उपाध्ये, श्रीमती चव्हाण, जनगौडा यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक आर. एम. तरळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये मंडोळी हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका चांगुणा चव्हाण यांनी व्याकरणातील वृत्त यावर चर्चा केली. तर दुसऱया सत्रात तुरमुरी हायस्कूलचे शिक्षक ए. आर. पाटील यांनी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व संभाव्य प्रश्न कोणते? या विषयावर चर्चा केली. तिसऱया सत्रात अगसगा हायस्कूलचे शिक्षक वाय. के. पाटील यांनी पीपीटी कशी तयार करायची याबाबत माहिती दिली. शेवटी फोरमच अध्यक्ष व कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव यांनी एफ. ए. 1,2,3,4 ला येणाऱया प्रश्नपत्रिका क्रियायोजना यामुळे मुलांची गुणात्मक वाढ कशी होते. तसेच मुलांच्याकडून निबंध, पत्रलेखन, कल्पनाविस्तार कसे लेखन करून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी नोडल अधिकारी यडमाने यांनी मराठी व हिंदी विषय शिक्षकांचे कौतूक करून आभार मानले.









