ऑनलाईन टीम / मुंबई :
वर्धा जिह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेतील पिडीत तरुणीची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
अशा परिस्थितीमध्ये आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ही माहीती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, कितीही क्रूरता… ही विचारांच्या पलिकडची पुरता आहे. एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करणारी घटना आहे. आणि आपण ही बातमी वाचून पान उलटतो हे त्यापेक्षा अधिक क्रूर असल्याचं महिंद्रा यांनी म्हटले आहे. तसेच, मी केवळ पान उलटून गप्प राहणार नाही, असेही ते यावेळी म्हटले आहे.