ऑनलाईन टीम / सोलापूर :
हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद संबंध देशभर उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर युवक कॉंग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. यावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, या घटनेचा मी निषेध करते. मुलींची छेडछाड करणाऱयांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहीजे. प्रशासन व घरच्यांनी पीडितेला पाठींबा दिला पाहीजे. तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले पाहीजे.
पुढे त्या म्हणाल्या, गुन्हेंगारांना तत्काळ कठोर शिक्षा झाली पाहीजे. तसेच या खटल्यांचा निकाल 90 दिवसांच्या आत झाला पाहीजे. नाही तर हैद्रराबादसारखं काही तरी करा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.