ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या लाहोरमधील जोहर टाऊन येथील घराबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटात 2 जण ठार झाले. तर लहान मुले आणि महिलांसह 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळच्या अनेक घरांच्या काच फुटल्या. तसेच खिडक्यांच्या भिंतीही पडल्या. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
तपासकार्यात अडथळा नको म्हणून, स्थानिक नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे लाहोरचे सीसीपीओ गुलाम डोगर यांनी सांगितले.









