प्रतिनिधी/ पणजी
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या प्रकरणाचा काँग्रेस पक्षाकडून देशभरात मुकमोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने गोव्याच्या ाराजधानीत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुकमोर्चाचे आयोजन केले होते. येथील आझाद मैदानावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी मोर्चाचे आयोजन केले होते.
यावेळई प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजीमंत्री संगीता परब, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हाथरस येथील घटनेबाबत सरकारने जी भूमीका घेतली आहे ती निंदनीय आहे. असे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणतात की बेटी बचावो बेटी पढावो. प्रत्येक्षात मात्र मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत. मोदीनी 2017 साली उत्तरप्रदेशात केलेले भाषण आज जनतेने ऐकायला पाहिजे मोदी किती खोटे बोलतात त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येईल असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकाराच्या काळात होत असलेले महिलांवरील अत्याचार काँग्रेस खपवून घेणार नाही असेही चोडणकर म्हणाले.
कोणत्याही व्याक्तीवर अत्याचार झाल्यास त्यांना सहानाभूती देण्यासाठी त्यांना भेटायला जाणे ही आम्हा भारतीयांची संस्कृती आहे. हातरस येथील ज्या कुटुंबावर संकटांचे पहाट कोसळले त्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रीयांका गांधी गेले होते. तेथील पोलिसांनी त्यांना दिलेली वागणून ही घृणास्पत आहे. असे दिंगंबर कामत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे हाथरस येथील घटना काय भयानक असले याचा विचारही करणे कठीण आहे. तेथील सरकार मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी धडपडत आहेत. या प्रकरणातील संशयितांना त्वरी अटक होऊन त्यांना योग्य शासन व्हावे अशी अपेक्षा कामत यांनी व्यक्त केली आहे.









