सैन्यदल भरतीकडे जाण्यासाठी रत्नागिरीतील तरुणांसमोर ठेवली नवी उमेद
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील हजारो तरुणांनी आपल्या सैन्यात आपले मोठे योगदान दिले आहे. मात्र सोशल मिडीयावर राष्ट्रवादाची भावना व्यक्त करणारा येथील तरूण आजच्या काळात सैन्यदलातील भरतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. पण रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावचा सुपुत्र सुयश सुनील कांबळे या तरुणाने भारतीय सेनेत भरती होण्याचा चंग बांधला आणि वायुसैनिक म्हणून पात्र ठरल्याने त्याने रत्नागिरीसह हातखंबा गावची मान अभिमानाने उंचावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील तरुण सैन्य भरतीसाठी कोणत्याही प्रदेशात जाण्यास तयार होतात. त्या मानाने कोकणातील तरूण सैनिक वा अन्य कोणत्याही भरतीसाठी आपला प्रदेश सोडून इतर भागात जात नाहीत, असे म्हटले जाते. भारताच्या रक्षणासाठी सैन्यदलात आतापर्यंत रत्नागिरी जिह्यातील हजारो तरुणांनी सैन्यात आपले योगदान दिले व आजही भारतमातेच्या रक्षणासाठी सैन्यदलात येथील अनेक तरूण सदैव तत्पर आहेत. पूर्वी भारतीय सेनेत मराठा रेजिमेंटमध्ये कोकणातील तरूणांची संख्या सर्वाधिक होती, असेही सांगितले जाते. पण कालांतराने भारताच्या सैन्यदलात कोकणातील तरुणांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याबाबत रत्नागिरीत मागील सैन्यभरतीवेळी उपस्थित असलेल्या लष्करी अधिकाऱयांनी चिंता व्यक्त केली होती.
पूर्वी या भरतीसाठी जिल्ह्यातील उमेदवार कित्येक महिने प्रचंड मेहनत घेत होते. सैन्यात तरुणांची निवड झाली की, त्यांचे गावोगावी सत्कारही केले जात असत. गावाची मान त्यामुळे अभिमानाने उंचावली जायची. आजही हा सन्मान गावोगावी सैनिकांना दिला जातो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यायातून आज सैन्यदलात नव्याने भरती होणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने ही संख्या कमी झाली आहे. उत्तर रत्नागिरीपेक्षा दक्षिण रत्नागिरीत सैन्य दलात भरती होणारे तरूण अपवादाने दिसतात. असाच एक असलेला सुयश कांबळे (23) या तरुणाचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा कदमवाडी येथील हा तरूण महाविद्यालयीन शिक्षण घेता – घेता त्याने सैन्यदलात भरती होण्याची खुणगाठ मनाशी पक्की केली. वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असताना 12 वी नंतर पदवीकडे वाटचाल करत होता. त्याचदरम्यान सांगली तासगाव येथे 2017 मध्ये सैन्य भरती लागली होती. या भरतीसाठी सुयशने उडी घेत तो त्यामध्ये सहभागी झाला.
निवड यादीत नाव जाहीर होताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कांबळे कुटुंबियही आपल्या मुलाच्या या निवडीने आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर सुयशच्या सैन्यदलातील खडतर पशिक्षणाला पारंभ झाला. हे पशिक्षण म्हणजे भरती झालेल्या उमेदवारांची सत्वपरीक्षा ठरते. सुयश मोठ्या उमेदीने बेळगाव येथे ट्रेनिंग गेला. तेथे 6 महिने पशिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीत कमांडो पशिक्षण होते. तेथील 1 वर्षाच्या पशिक्षणही जिद्दीने पूर्ण केले. या साऱ्या जिद्दीच्या प वासानंतर सुयश या भरतीत यशस्वी झाला. त्याला भारतीय हवाई दलात आता ‘एअरकाफ्ट मन’ ही रँक मिळाली असून तो कलकत्ता येथे 3 नोव्हेंबरला रुजू होणार आहे. सुयशला या यशासाठी त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ व सदैव मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पोत्साहनामुळे या भरतीत यश मिळाल्याचे सुयश सांगतो.










