वार्ताहर / कसबा सांगाव
देशासह राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य शासनाने कडक लॉकडाऊन केले आहे. परंतु राज्य शासनाने उद्योग क्षेत्रातील उद्योग या लॉकडाऊन काळातही नियम व अटीच्या अधिन राहून सुरू करण्यास परवानगी दिली. यात कंपन्यानी कामगार, अधिकाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय कंपनीत करावी, सोशल डिस्टन्स, आरोग्याची सुविधा, सॅनिटायझर व अन्य सुविधा पुरवण्यात याव्या असे सांगण्यात आले होते.
यांचा उद्देश करोना संसर्ग वाढू नये हा आहे. नियमाची व अटीची अमंलबजावणी होत आहे की नाही यााबाबत तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पथक नेमले आहेत. परंतु तपासणी पथकाकडून कागल हातकणंगले पंचताराकींत औद्योगिक वसाहतीतील कंपन्याची तपासणी केली का नाही हे समजत नाही . कारण सर्वच कंपन्यानी कामगार, अधिकारी वर्गाची कंपनीत राहण्याची सोय केली नाही. येथे ६५० च्या आसपास लहान मोठे उद्योग आहेत. येथे काम करण्याऱ्या कामगारांची संख्याही जास्त आहे.
पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीमध्ये सिमाभागातून येणाऱ्या कामगार संख्याही लक्षणिय आहेे. औद्योंगिक क्षेत्रातील सर्वच कामगार शिफ्ट सुटल्यानंतर आपआपल्या घरी जाताना दिसत आहेत. अनेक कंपन्या नियम व अटीचे पालन करताना दिसत नाहीत. तपासणी पथक कंपन्याची तपासणी करणार कधी व आदेशानुसार अमंलबजावणी न करणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार कधी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीतील कंपन्यानी करोनासंबधी त्यांनीच आवश्यक यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
एखादा कामगार करोना पॉझिटीव्ह सापडल्यास त्याला विलगीकरनात ठेवत घरच्यांना सावध केल पाहिजे मात्र अशा प्रकारची काळजी घेतली जात नाही. काही कामगार पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. याची चर्चा औद्योगिक वसाहतीत सुरू आहे. औद्योगिक वसाहती जवळील गावात करोना रुग्ण संख्या वाढतच आहे. भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.









