मसूर, वाटाणा पिके खराब होऊ लागल्याने उत्पादक शेतकरी संकटात
वार्ताहर /किणये
खरीप हंगामानंतर तालुक्मयातील शेतकरी रब्बी हंगामातील पिके मोठय़ा प्रमाणात घेतात. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱयांना रब्बी हंगामातील पेरणी करता आली नाही. धडपड करून काही शेतकऱयांनी शेतशिवारामध्ये रब्बीची पेरणी केली. मात्र, हवामानातील वारंवार होणाऱया बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे तालुक्मयाच्या काही शिवारातील मसूर व वाटाणा पिके खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्मयात भात हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. यावषी ऐन भात कापणीच्या काळातच मोठा पाऊस पडल्यामुळे बहुतांशी शेतशिवारातील भातपिके पाण्याखाली गेली. यामुळे भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे बऱयाच शेतशिवारात रब्बी हंगामातील पेरणी करता आली नाही. काही शेतकऱयांनी रब्बी हंगामातील मसूर, वाटाणा, हरभरा आदींची पेरणी केली आहे. आता रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर शेतकऱयांची आस लागून राहिलेली आहे. मात्र, अनेकदा ढगाळ वातावरण व हवामानातील बदलांमुळे रब्बी पिकेही धोक्मयात आली आहेत.
भात कापणीनंतर बहुतांशी शिवारात ज्वारी, चणी, वाटाणा आदी कडधान्यांची पेरणी केली. ही पिके सध्या बऱयापैकी बहरून आलेली आहेत. मात्र, हवामानात होणाऱया बदलांमुळे मसूर व वाटाणा पिके खराब होऊ लागली असल्याने शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पिरनवाडी, मच्छे, राजहंसगड, नंदिहळ्ळी, धामणे, येळूर, बसवनकुडची, सांबरा, निलजी, मुतगा, बस्तवाड, हलगा, नावगे आदी भागांमध्ये मसूर व वाटाणा पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले आहे. लवकर खरीप हंगामातील सुगी करून ज्या शेतकऱयांनी वाटाणा व हरभऱयाची पेरणी केली होती, तो वाटाणा व हरभरा आता काढणीसाठी आला आहे. सध्या बेळगावातील वाटाणा नव्वद ते शंभर रुपयेप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. या दरात काही ठिकाणी बदलसुद्धा आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर बहुतांशी शिवारातील वाटाणा काढणीसाठी येणार आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावासुद्धा झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके खराब होऊ लागल्याने शेतकऱयांमध्ये चिंता वाढली आहे.