प्रतिनिधी / म्हापसा
हळदोणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गमपती विसर्जन सोहळा थाटात पार पडला. दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे विशेष कार्यक्रम घेण्यात आले नाही. हळदोणच्या राजाचे यंदा आठव्या वर्षात पदार्पण झाले.
श्री सातेरी भगवती मंदिर सभामंडपात स्थापण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे यजमानपद सौ. व श्री. संजय अम्रे यांनी भूषविले. दुपारी व रात्री आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. विसर्जनाच्या दिवशी दुपारी श्री राष्ट्रोळी घुमट आरती संघ हळदोणे पानारी यांच्यातर्फे घुमट आरती झाल्या. गणपतीची मिरवणूक ठरलेल्या मार्गाने झाली. यात बऱयाच भाविकांनी भाग घेतला. हळदोणे बाजारात गणपतीचे आगमन झाल्यावर श्रींच्या फळफळांची पावणी झाली. पावणीसुद्धा या गणेशोत्सवाचा एक कुतुहलाचा भाग असतो. कोरोना ध्यास्ती असल्यामुळे अल्पशा दारुकामानंतर मिरवणूक विसर्जनासाठी हळदोणे खोर्जुवे तारीकडे निघाली. आरती व गाऱहाणे झाल्यानंतर रात्री 8 वा. गणपतीबाप्पा आपल्या घरी निघाले. एरवी विशेष क्रेनच्या आधारे विसर्जन सोहळा व्हायचा. हा सोहळा पाहण्यासाठी बऱयाच भाविकांची गर्दी असते. पण यंदा साधेपणाने सोहळा संपन्न झाला.
आमदार ग्लेन टिकलो, माजी आमदार किरण कांदोळकर व इतरांनी उत्सवाला उपस्थिती लावली. मंडळ अध्यक्ष व्यंकटेश गावठणकर, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वळवईकर, विसर्जन समिती अध्यक्ष प्रणेश नाईक यांच्या प्रतिनिधीत्वाखाली गेली पाच वर्षे हा सोहळा संपन्न होत आहे. अवघ्या काही वर्षांनी गणपतीला सोनेरी मुकूट परीधान करण्यात आला ही या गणेशोत्सवाची बाजू आहे.









