इंफाळ (मणीपूर)
हॉकी इंडियाच्या 12 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य लढतीत हरियाणाने मध्यप्रदेशचा तर झारखंडने उत्तरप्रदेशचा पराभव केला.
या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने मध्यप्रदेशचे आव्हान 8-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. हरियाणाची कर्णधार सावीने पाच गोल तर निधीने दोन तर रियाने एक गोल केला. या स्पर्धेतील हरियाणा हा विद्यमान विजेता संघ आहे. दुसऱया उपांत्य लढतीत झारखंडने उत्तरप्रदेशवर 2-1 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. झारखंडतर्फे कर्णधार बालो होरो आणि निशा यांनी प्रत्येकी एक गोल तर उत्तरप्रदेशतर्फे पूर्णिमा यादवने एक गोल केला.









