हरमल / वार्ताहर
केंद्र व राज्य सरकार नागरिकांच्या मदतीने जनता कर्फ्य, लॉकडाऊन सारख्या उपायांनी लोकांना कोविडची बाधा होणार नाही ह्याची काळजी घेते, गावातील स्वयंसेवकसुद्धा जीवाचे रान करून नागरिकांना घराबाहेर पडू देत नाही हे वैशिष्टय़. मात्र स्वयंसेवकांच्या धीरोदात्त प्रणालीला काहींनी स्वार्थी, हेकेखोरपणाचा व कुचेष्टाचा दर्प दिल्याने अशा लोकांचा निषेध करावा तितका थोडा.
हरमल भागांतील 20-22 स्वयंसेवक गेले आठ दिवस जनसामान्यांना जीवनाश्यक वस्तूची घरपोच डिलिव्हरी देत आहेत. उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार स्वयंसेवक प्रत्येक घरात जीवनाश्यक वस्तू घरपोच देत आहेत. काही घरांत दोन वेळा तर काही ठिकाणी एका खेपेत व्यवहार पूर्ण होतात. बरे कडधान्य व जीवनाश्यक वस्तू एकाच छताखाली मिळत नाहीत उलट तुटवडा झाल्याने दोन दिवसांनी पुरवठा व वितरण झाले व केले. स्वयंसेवक म्हणतात, दररोज सकाळ सहा वाजता सुरू होते, तर दुपारचे जेवण 4 वाजता होत असल्याचे बहुतेक स्वयंसेवकांनी सांगितले.
मात्र भयानक विषाणू बाधेपासून रक्षण करण्यासाठी कष्ट करण्याची मानसिकता असल्याचे स्वयंसेवक संतोष कोरकणकर, सुखानंद नाईक,अमित नाईक,आदर्श नाईक व पंच प्रविण वायगंणकर आदींनी सांगितले.
दरम्यान,हरमलात भाजीपाला खूपच उशिराने बाजारात आल्याने लोकांची गर्दी वाढली. मात्र 80 टक्के लोकांनी संयम बाळगून स्वयंसेवकांवर विश्वास ठेवला व त्या सर्वांनी घरोघरी सेवा दिली. सेवा देताना ज्या बिलाची पावती तितकेच पैसे घेऊन दुकानमालकांस सहकार्य केले. कोणाकडूनही एकही पैसे जादा घेतला नाही असे सांगितले.
ह्या सर्व धावपळीत कोणीही त्यांच्यावर टीका करणे योग्य आहे का, असा सवाल निर्माण होत आहे.मुळात स्वयंसेवकांनी कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचे स्पष्ट आहे.तुम्ही त्याना संपर्क साधल्यास ते सेवा देण्यास तत्पर असून, त्याना रागावण्याचा व स्वार्थी म्हणण्याचा अधिकार नागरिकांना निश्चित नाही.त्यानी मिळेल त्या प्रमाणात वस्तू,भाजीपाला साहित्य घरपोच दिले. तरीही काही स्वतःला ’ग्रेट’ समजणारे लोक स्वयंसेवकांना स्वार्थी म्हणू लागल्याने अश्या लोकांची सध्याच्या स्थितीत मानसिकता व लायकी कळून येते असेच म्हणावे लागेल.
सध्याचा काळ तणावाचा व जीवनमरणाचा असूनही मनुष्य दुसऱयांना टोचून बोलण्याचे व दुखविण्यात धन्य मानू लागल्याने,जितके आश्चर्य तितकेच स्वतःचा जीव धोक्मयात घालून, उदार होऊन स्वयंसेवक बनण्याचे कार्य पार पाडणारे पाहिले की माणुसकी शिल्लक आहे ह्याचे समाधान वाटते.









