प्रतिनिधी/बेळगाव
हनुमाननगर येथे एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बसवराज शिवाप्पा पुजारी, रा. यरगोप्पा, ता. बैलहोंगल असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 1740 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.









