प्रतिनिधी/ संकेश्वर
समोरुन जाणाऱया वाहनास पाठीमागून येणाऱया वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात हत्तरगी टोलनाका येथे मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कार (क्र. के. ए. 17 एन 6900) यमकनमर्डी येथील टोलनाक्यावरुन बाहेर निघत असतानाच पाठीमागून आलेल्या व मुंबईहून केरळकडे जात असलेल्या कार (क्र. एम. एच. 48 एस 2857) च्या चालकाचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या वाहनास धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाहीत. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत अपघाताची पोलीस स्थानकात नोंद झालेली नव्हती.









