वार्ताहर / कसबा बावडा
हणबरवाडी तालुका करवीर येथिल मालूबाई रंगराव ढेंगे वय वर्षे ३५ यांचे सर्पदंश होऊन निधन झाले. या बद्दल मिळालेली माहीती अशी की मालूबाई या आज सकाळी ११ च्या दरम्यान शेतात गेल्या असता काम करताना उजव्या पायाच्या घोट्याजवळ सर्पदंश झाला होता. त्या वेळी त्यांना उपचारासाठी सेवा रुग्णालय येथे आणण्यात आले होते. उपचारापुर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद सेवा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
Previous Articleपुणे : योगी सरकार बांगडी भरो आंदोलन
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये 608 रुग्ण कोरोनामुक्त









