वार्ताहर/ कास
कडक उन्हाळ्याची चाहुल लागली असुन उष्णता वाढु लागल्याने झ्रयाचे पाणी आटण्यास प्रारंभ झाल्याने तिव्र पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होऊन कुसुंबीमुरा(ता.जावली)येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे.रात्री उंचकडय़ाकपारीत झ्रयाचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरून विपरित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.शेकडो जनावरांदेखील पाणीटंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे.
पाण्याशिवाय कोणीही जगु शकत नाही पाणी हे अतिआवश्यक असतानाही पावसाच्या आगरातच हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची होणारी वणवण म्हणजे लोकप्रतिनिधी आणी प्रशासनाचे आपयशच म्हणावे लागेल जिथं पाण्यासाठी ऐवढी धडपड करावी लागतेय तिथं शासकीय सुविधा किती पोहचल्या असतील ही सांगण्यापलीकडचीच गोष्ट असुन आता तरी लोकप्रतिनिधी आणी प्रशासन वेळेत लक्ष घालुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवुन नागरीकांची भंटकती थांबविणार का असा सवाल नागरीकांतुन उपस्थीत होत आहे
पावसाचे आगार असणाया या डोंगरी भागात डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी मोठयाप्रमाणावर वाहुन जाते.परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे.कुसुंबीमुरा येथील 24कुंटुबे असणाया आखाडेवाडीतील 150- 200 लोकसंख्या असणाया ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतुन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता.ज्या झ्रयातुन पाणी टाकीत सोडले जात होते त्या झ्रयाचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवडय़ात झ्रयातुन टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. सदयस्थितीला झ्रयाचे पाणी मोठय़ाप्रमाणावर कमी झाल्याने डोंगरातील झ्रयावर दोनशे अडीचशे फूट खोल दरीत कडयालगत असणाया झ्रयावर रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी महिला,लहानगे,पुरुषमंडळी पायपीट करताना दिसत आहे.
डोंगरदरी,झाडाझुडपाच्या मार्गाने छोटय़ा भांडय़ाने लहानगे,महिला,पाण्यासाठी धडपडत आहेत.पावसाळा सुरू व्हायला बराचसा कालावधी असून वेळेत पाऊस पडला तर ठीक अन्यथा पठारावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.अवकाळी पावसाने झ्रयाचे पाणी वाढले जात नसुन पावसाळ्यातील पावसाने जेव्हा पठारावर पाणी साचुन राहते तेव्हाच झ्रयाच्या पाण्यात वाढ होते
ग्रामस्थ शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत.दिवसभर लहानगे भांडी घेऊन झ्रयावर तळ ठोकुन आहेत.झरा लोकवस्तीपासुन काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुंटुबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातुन कडक उन्हात डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे.डोंगरउतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने उंचमाथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थ बोलतात.








